पुणे महाराष्ट्र

मला पुणे महापालिकेचं राजकारण उमगलं नाही- शरद पवार

पुणे | राजकारणात वावरताना अनेक महानगरपालिकांशी माझा संबंध आला. परंतु आजवर मला पुणे महानगरपालिकेचं राजकारण उमगलं नाही, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

माजी महापौर उल्हासराव ढोले-पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

एकवेळ तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या पातळीचं राजकारण करु शकता. पण पालिकेच्या आणि त्यातही पुणे महापालिकेच्या राजकारणाचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

सोबत असलेली माणसं पुणे पालिकेची निवडणूक जाहीर होताच कुठे जाऊन बसतील याचा नियम नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बीडमध्ये राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांमध्ये रंगली टस्सल; पाहा कुणी मारली बाजी…

-जेव्हा हार्दिक पांड्या शिखर धवनवर चिडतो… 

-आता मोदींना घरी पाठवण्याची वेळ आली- चंद्राबाबू नायडू

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार कन्येचा पराभव

-परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या