RAFALE DEAL: सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली- शरद पवार

नवी दिल्ली | राफेल विमान खरेदी प्रकरणात कॅगच्या अहवालाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणात कॅगने अभ्यास केला असून संसदेच्या लोकलेखा समितीनेही मंजूरी दिली आहे, असं केंद्र सरकार न्यायालयात म्हटलं. पण हे खोटं आहे, असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस नेते मलिक्कार्जुन खरगे यांनीही केंद्र सरकारवर टीका केली अाहे. कॅग आणि अॅटर्नी जनरलना संसदेच्या लोकलेखा समितीसमोर आम्ही बोलावू, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भाजप सरकारला दिलासा दिला होता.

महत्वाच्या बातम्या –

-मुंबई-दिल्ली विमानात बाॅम्ब असल्याच्या फोनमुळं खळबळ

-ब्राह्मण आरक्षण मिळणं अशक्य- देवेंद्र फडणवीस

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 84 परदेश दौऱ्यांवर 2 हजार कोटींचा खर्च!

-माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी