महाराष्ट्र मुंबई

मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाने एक मेसेज सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे. शरद पवारांपर्यंत हा मेसेज पोहोचल्यानंतर त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून शरद पवार त्यांच्या मोबाईलचं रिचार्ज मोफत करुन देणार असल्याचं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे.

व्हाॅट्सअ‌ॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमुळे पवार चांगलेच संतापले आहेत. याबाबत ट्विट करत त्यांनी खुलासा केला आहे.

काही समाजकंटकांनी असे खोटे मेसेज व्हायरल करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली आहे. यावर विश्वास ठेवू नका, ही केवळ अफवा आहे, असं शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार यांचं ट्विट-

महत्त्वाच्या बातम्या-

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

“शरद पवार माझ्या हृदयात तर उद्धव-आदित्यचं बळ माझ्या शरीरात”

-अहिरांनी राष्ट्रवादी सोडली अन् पक्षाने लगोलग या नेत्याची मुंबई अध्यक्षपदी निवड केली!

-“शरद पवार शिवसेनेत येतील असं वाटत नाही”

-“अहिर जरी सेनेत आले असले तरी वरळीचा पुढचा आमदार मीच…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या