बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार शेतकऱ्यांना म्हणतात, अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून…

बारामती |  अजितदादा अर्थमंत्री होता म्हणून तुम्हाला वीजबीलं न भरण्याची सवय लागली आहे. ती सवय आता मोडा…, असं दुष्काळ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शेतकऱ्यांना म्हणाले आहेत.

शरद पवार आणि अजित पवार आज बारामती आणि दौंड तालुक्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आहेत. तेथील भागाची पाहणी करून ते शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

पाऊस पडेपर्यंत नाही तर नवा चारा तयार होईपर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, आज सकाळी बारामती तालुक्यातील खैरेपडळ येथील जनावरांच्या छावणीस भेट देऊन त्यांनी या दुष्काळ दौऱ्याला प्रारंभ केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-मी पक्षाची शिस्तबद्ध सदस्य; इथून पुढे शिस्त पाळणार- साध्वी प्रज्ञा

-उदयनराजे म्हणतात, सध्या देशात 1857च्या बंडासारखी परिस्थिती

-आज शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्रित दुष्काळ दौरा

-भाजपच्या चिन्हावर लढलो तर आमचं काय राहिलं मग…- रामदास आठवले

-सरकारच्या ‘या’ निर्णयाविरूद्ध इंदापुरचे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More