कोल्हापूर महाराष्ट्र

मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवाय- शरद पवार

कोल्हापुर | मला चौकीदार नको देश सांभाळणारा मालक हवा आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ते कोल्हापुरमध्ये प्रचारसभेत बोलत होते.

मोदींनी अकलूजमध्ये झालेल्या प्रचारसभेत बोलताना साखर कारखानदारी आणि माझ्यावर टीका केली पण खरे साखर कारखानदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे मंचावर उपस्थित होते, असं म्हणत पवारांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला.

मी कोणत्याही कारखान्याचा अध्यक्ष किंवा संचालक नाही. मी फक्त नामांकित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मी कृषीमंत्री म्हणून असताना सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली होती, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

“चौकीदार साहेबांच्या दररोज 20 तास काम करण्याने देश उद्ध्वस्त होतोय”

“नरेंद्र मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी इस्लामी देशांकडून फंडिंग”

-“देशासाठी बलिदान देणाऱ्या कुुटुंबासमोर नतमस्तक होण्यात गैर नाही”

-भीती वाटल्याने भाजपने उमेदवार बदलला; सुशीलकुमार शिंदेंचे टीकास्त्र

-हेलिकॉप्टर मधून हिरवागार झालेला महाराष्ट्र पाहिला- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या