Top News

शरद पवार पुन्हा लोकसभेच्या रिंगणात?; माढ्यातून निवडणूक लढण्याची शक्यता

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून त्यांनी पक्षाच्या बैठकीत इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु होती. ‘झी 24 तास’ या वाहिनीनं याबाबत वृत्त दिलं आहे. 

शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये बैठक सुरु होती.

शरद पवार माढ्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं विजयसिंह मोहिते पाटील काय भूमिका घेणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीत उतरणार नसल्याचं जाहीर केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

…तर आम्हाला कैदी केल्याशिवाय राहणार नाहीत- प्रकाश आंबेडकर

“‘भारतरत्न’ हा तर सवर्ण आणि ब्राम्हणांचा क्लब”

-पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विरेंद्र सेहवाग म्हणतो…

बारामतीतून राष्ट्रवादीच्या विरोधात मीच दंड थोपटणार- महादेव जानकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या