बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही?”

मुंबई |  महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवर टीका केली होती. यावरून आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

कोर्टाच्या आदेशानंतरही शरद पवार टीका करतात. त्यामुळे त्यांचा न्यायालयावर विश्वास आहे की नाही? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले काही मुद्दे खोडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर देखील टीका केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी काही कारवाई झाली ती उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली होती. उच्च न्यायालयानं यासंदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. खरंतर राज्यात सरकार आल्यानंतर सीबीआयने आमच्या राज्यात चौकशीच करू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला उद्देशून म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून सोमवारी 11 तारखेला महाराष्ट्र बंद करण्यात आला होता. या बंद वरून देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यकर्ते लोकांवर दबाव टाकतात,  लोकांना बंद करायला भाग पाडतात. इतकचं नव्हे तर त्यांचा माल घेऊन पळून जातात आणि पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे हे कुठलं राज्य आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“तर नेटफ्लिक्सकडून अजित पवारांना 2-3 कोटी रुपयांची रॉयल्टी मिळेल”

आला रे आला ‘लॉर्ड शार्दुल’ आला! ‘या’ खेळाडूच्या बदल्यात विश्वचषक संघात शार्दुलची एन्ट्री

पतीला दुहेरी जन्मठेप, पत्नीची हत्या कशी केली वाचाल तर काळजाचा थरकाप उडेल!

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी खळबळ

…तर 30 आमदारांचे तिकीट कापणार; भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा इशारा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More