बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात मोठ्या राजकीय घडीमोडी सुरु, शरद पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकरीय घडामोडी घडत आहे. राज्यात सध्या अनेक प्रकरणांवरून राज्य सरकारला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमाही मलिन होत आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक बोलवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंपासून ते आता सचिन वाझेंच्या प्रकरणापर्यंत सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार बैठकीत घेणार आहेत. ही बैठक सकाळ आणि दुपार या सत्रात होणार आहे. सुरूवातील धनंजय मुंडे यांच्यावर एका तरूणीने बलात्काराचा आरोप केला होता. तर त्यावेळी विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र काही दिवसांनी त्या तरूणीने आरोप मागे घेतले.

त्यानंतर काही दिवसात पूजा चव्हाणा आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणामध्ये 12 ऑडिओ क्लिप आणि काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळीही ठाकरे सरकारवर विरोधकांनी अनेक आरोप केले होेते. असं असतानाच मुंबई स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. यावरूनही विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.

दरम्यान, सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्याने केल्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळेच आता शरद पवारांनी बैठक बोलावली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप

बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड

काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More