“सत्ता येते सत्ता जाते पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ पाहिलं नाही”
मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हजेरी लावली.
बैठकीवेळी बोलताना शरद पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दोन वर्षांपूर्वी सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणलं. सरकार चांगलं काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
सत्ता येते सत्ता जाते पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ झालेलं मी पाहिलं नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचं असतं आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, अशी टीका शद पवारांनी भाजपला उद्देशून केली आहे.
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असल्याचंही शरद पवार म्हणाले. तर आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे.
थोडक्यात बातम्या-
“सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजलं, ते आता आमच्यावरच फुत्कारतंय”
मोठी बातमी! आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
“माझे अनेक बाॅयफ्रेंड झाले पण….”; अभिनेत्री तब्बूचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका, म्हणाले….
मोठी बातमी! राज्याच्या अनलाॅकविषयी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम
Comments are closed.