आम्ही दत्तकाच्या जोरावर घर चालवत नाही; शरद पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | नाशिक जिल्हा दत्तक घेतल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान वाचून  मला मोठी गंमत वाटली होती. पण यापुढे अशा दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याचा संदर्भ देत त्यांनी हा निशाणा साधला आहे.

बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. आपला खराखुरा बाप शेतकरी आहे. त्याच्याचं मदतीवर आपण पुढे जाऊया, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, अपूर्व हिरे आणि अद्वैत हिरे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका

-शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं