“कुलभूषण जाधवांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा”

बीड | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांच्यातील आरोप-प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीय. शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते आष्टी येथील प्रचार सभेत बोलत होते.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला कुलभूषण जाधव यांना सोडवून आणा आणि मग 56 इंचाची छाती दाखवा, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

पुलवामा हल्ल्यात आपले 40 जवान शहीद झाले. त्यावेळी नरेंद्र मोदींनी आपली 56 इंची छाती तपासली का? असा सवालही त्यांनी केला आहे.

लोकशाहीवर टाच आणण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

-भाड में गया कानून और भाड में गयी आचारसंहिता; संजय राऊतांची जीभ घसरली

-“विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये”

-मायावतींचा बीएसपी सर्वात श्रीमंत पक्ष; भाजप-काँग्रेसलाही टाकले मागे

-राज ठाकरेंच्या सभांना मागणी वाढली; आता हे उमेदवार म्हणतात माझ्या मतदारसंघात सभा घ्या!

-…म्हणून राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेस सोडत नाहीत- बाळासाहेब थोरात