सोलापूर | मीच देव आहे असं म्हणणाऱ्या सोलापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.
महाराज नमस्कार, ही 5 रुपयांची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचं काम नाही, असं म्हणत पवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
सोलापूरचे महाराज मताचा शिक्का मागत आहेत. पण साधू संत कोणाकडे मागत नाहीत, मागणारा संत असूच शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
महत्वाच्या बातम्या-
–पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ; या प्रकरणात मिळाली नोटीस
-15 दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार; राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
-सत्तेत येऊ द्या, निवडणूक आयोगालाही जेलची हवा खायला पाठवू- प्रकाश आंबेडकर
-वायनाडच्या लोकांनी अमेठीत येऊन पाहावं आणि सावध व्हावं, स्मृती इराणींचा निशाणा
“स्वत:च्या पत्नीला वाऱ्यावर सोडणाऱ्या मोदींनी तिहेरी तलाकविरोधात कायदा आणला”
Comments are closed.