Top News अहमदनगर महाराष्ट्र

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

अहमदनगर |  एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं आहे, असा टोला राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी लगावला आहे. माजी आमदार कै. यशवंत भांगरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

यशवंत भांगरे माझ्या अगोदर 5 वर्ष अगोदर विधानसभेत होते. ते मला ज्येष्ठ होते. अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग होता, असं पवार म्हणाले.

अकोले येथील येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याची माहिती मिळाली. कारखान्यावर 200 कोटीच‌ कर्ज झाले जे या‌ कर्जाला जबाबदार आहेत ते शुक्राचार्य बाजुला करा, अशा शब्दात शरद पवार यांनी पिचड यांच्यावर निशाणा साधला.

दरम्यान, अकोले तालुक्यातील जनतेने परिवर्तन करत आम्हाला साथ दिली आणि ती अशीच पुढेही द्यावी, असं आवाहनही शरद पवार यांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या