बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी म्हणाले घुसके मारूंगा…. अहो लढणार सैन्य ना मग तुमचा काय संबंध??”

मुंबई |  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडायला सुरूवात झाली आहे.  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी म्हणायचे घुसके मारूंगा… अहो लढणार सैन्य, यांचा काय संबंध ?  म्हणत लोकांना वाटलं यांनीच कामगिरी केली आणि लोकसभेत यांना मत दिलं.. आणि भाजपा सरकार आलं ..पण आता कशाच्या आधारे निवडणूक लढवणार? अशा शब्दात पवारांनी मोदींना लक्ष्य केलं.

याआधी देशातील सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा वापर मतांसाठी केला नाही. ज्या ज्या वेळी पाकिस्तान आणि भारतात युद्ध झाले, तेव्हा प्रत्येक वेळी सैन्याने पाकिस्तानला चोख धडा शिकवला आहे. पण आताचे राज्यकर्ते प्रत्येक वेळी सैन्यांच्या जीवावर मतं मागत आहेत, अशी टीकाही पवार यांनी केली.

विधानसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पवार बुधवारी विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी महाआघाडीला निवडून देण्याचं आवाहन पवारांनी केलं.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर भूगोल बदलत पाकिस्तानचे विभाजन केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत स्वतः घेतले नाही, ते काम पंतप्रधान मोदींनी केलं, असा टोला त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More