महाराष्ट्र मुंबई

दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही- शरद पवार

मुंबई | राज्य सरकारांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता, त्यांच्याशी सल्लामसलत न करता केंद्राने तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांवर बळजबरीने लादले, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शेतकरीवर्ग देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. खेडोपाडी तो काबाडकष्ट करून शेती फुलवतो. अशा स्थितीत दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

यूपीए सरकारच्या कालावधीत कृषिमंत्री असताना मला आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणायच्या होत्या. त्यासाठी आम्ही सगळी तयारीही केली. सर्व राज्यांना विश्वासात घेतलं. त्यांच्याशी वेळोवेळी प्रदीर्घ चर्चा केली, असं पवारांनी सांगितलं.

या आंदोलनाला राजकीय पक्षांची फूस आहे, या पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचाही पवारांनी यावेळी समाचार घेतला. या मागे कोणत्याही पक्षाचा हात नाही. उलट शेतकऱ्यांनीच राजकीय पक्षांना आंदोलनापासून चार हात लांब ठेवले आहे. अशावेळी या आरोपात तथ्य उरत नसल्याचं पवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार

“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचं निधन

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?”

ब्रिटनमधील ‘स्ट्रेन’चा एकही रुग्ण राज्यात नाही- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या