Top News

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला- शरद पवार

पुणे | महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांकडून बिहारमधील यशाचं श्रेय बिहार निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय.

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला, अशी मिष्किल टीका शरद पवार यांनी केली आहे.

शरद पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र नितीश कुमार यांचं फार नुकसान होण्याची भीती होती, तसं घडलं नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

तेजस्वी यादव यांची मेहनत तरुण राजकारणी मंडळींसाठी प्रेरणादायी- शरद पवार

…म्हणून मुख्यमंत्री झाल्यास नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानावेत- संजय राऊत

“फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश”

“शब्द पाळला नाही तर काय होतं याचा अनुभव भाजपनं महाराष्ट्रात घेतलाय, त्यामुळे…”

शिवसेनेला बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर ‘नोटा’पेक्षाही कमी मतं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या