महाराष्ट्र मुंबई

शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण…- शरद पवार

मुंबई | एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं पण ठीक आहे निराशा ही माणसाला स्वस्थ बसू देत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचा ज्यापद्धतीने पाठिंबा मिळतोय तो पाठिंबा मिळाल्यानंतर जे काही नैराश्य आलं त्या नैराश्यातून हे सर्व होत आहे, असं पवार म्हणाले.

माणसाने आशा ठेवावी. त्यांनी मागेही मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन असं सांगितलं होतं आणि काल परवा असंच काहीसं सांगितलं आहे. ठीक आहे त्यांच्याकडे बारकाईने लोक लक्ष देतात. अशीच भावना त्यांची असेल तर आपण खबरदारी घेतली पाहिजे. ते लोकांच्या अधिक लक्षात येईल असा टोला पवारांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

मंदिर उघडा या विषयावर जे काही राजकारण केलं गेलं त्यावर मी काही भाष्य केलं नाही, असं पवारांनी सांगितलं. तसेच आपल्याला सत्ता मिळणार नाही यासंबंधीची अस्वस्थता आणि संताप आहे तो या माध्यमातून व्यक्त केला जात आहे, असं शरद पवारांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

प्रताप सरनाईकांवरील ईडीने केलेल्या कारवाईवर शरद पवार म्हणाले…

सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर अखेर सापडले!

“…तर केंद्र सरकार महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करेल”

ईडीच्या कारवाईनंतर प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

आम्ही या महाष्ट्राची औलाद आहोत, शहीद होऊ पण…- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या