Top News

मी म्हणजेच महाराष्ट्र… हा दर्प देवेंद्र फडणवीसांना नडला- शरद पवार

मुंबई | मी म्हणजेच महाराष्ट्र… मी म्हणेल तो महाराष्ट्र… माझ्या आसपास कुणीच नाही… हा ‘मी’ पणाचा दर्प देवेंद्र फडणवीसांना नडला, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

फडणवीसांच्या मी पुन्हा येईन… या घोषणेत मला काही वावगं वाटत नाही. तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही त्याचा उपयोग संघटनेसाठी करून घेणं अजिबात चुकीचं नाही. मात्र त्यात दर्प असता कामा नये, असं शरद पवारांनी म्हटलंय.

फडणवीस यांच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता. शरद पवार हे इतिहासजमा झालेलं नाव आहे. आता मीच आहे. मी म्हणजे सगळं. बाकी सगळे तुच्छ, अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकांना ‘मी’ पणा आवडत नाही. विनम्रता आवडते, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या