महायुतीत असलो तरी शरद पवारांची विचारधारा सोडणार नाही; अजितदादा भावूक

Ajit Pawar l राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा केला आहे. या वर्धापन सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. राज्यात राष्ट्रवादी गटात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वर्धापन दिन दोन्ही गटाने साजरी केला आहे.

शरद पवार यांचं पक्ष स्थापनेत सर्वात मोठं काम :

मुंबईत अजित पवार गटाकडून झालेल्या वर्धापन सोहळ्यात महायुतीमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 1999 मध्ये पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाला पुढे नेण्यात दिलेल्या योगदानाबद्दल शरद पवार यांचे अजित पवारांनी आभार मानले आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार यांची कामगिरी चांगली राहिलेली नसताना देखील अचानकपणे अजित पवार यांचे हे वक्तव्य राजकारणाला पुन्हा एकदा दिशा दर्शवणार ठरणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील एका पक्षाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना अजित पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदापेक्षा कमी कशावरही समाधान मानणार नाही या राष्ट्रवादीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. मात्र त्यावेळी ते म्हणाले की आम्ही अजूनही एनडीएचा भाग आहोत. त्यामुळे कसलेही गैरसमज करण्याचे कारण नाही.

Ajit Pawar l अजित पवार यांनी शरद पवारांचे आभार मानले :

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “गेल्या 24 वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व केल्याबद्दल मी शरद पवारजींचे तसेच पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असलेल्या सर्व दिग्गज नेतेमंडळींचे आभार मानू इच्छितो.” शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत. जुलै 2023 मध्ये अजित पवार आणि इतर काही नेते पक्षाविरुद्ध बंड करून महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.

मात्र असे असताना देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी वर्धापन सोहळा अगदी थाटामाटात साजरा केला आहे. सध्याच्या राजकारणावर देखील अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याच काम काहीजण करत होते. त्यामुळे येत्या विधानसभेला जोरदार तयारी करून मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title : Sharad Pawar did a great job in establishing the ncp party

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यातील विद्यार्थ्यांचा गणवेश ठरला! असा असणार शालेय गणवेश; वाचा संपूर्ण नियमावली

धो-धो पाऊस कोसळणार; राज्यातील या जिल्ह्यांना रेड व यलो अलर्ट जारी

या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होणार

मोठी बातमी! मुरलीधर मोहोळांना मिळालं ‘हे’ महत्त्वाचं खातं

नरेंद्र मोदींचं मंत्रिमंडळ जाहीर, कुणाला कुठलं खातं?, वाचा एका क्लिकवर