बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, त्यांना पक्षातून काढण्यात आलं”

मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासुन शिवसेना आणि भाजपमध्ये सतत आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत सुद्धा वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीतेंनी मी शरद पवारांना आपला नेता मानत नाही, असं वक्तव्य केलं आहे. गीतेंच्या या वक्तव्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यातच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वादात उडी घेतली आहे.

अनंत गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. शरद पवार हे कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरं आहे, मात्र शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, तर त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर काढण्यात आलं होतं. यामुळं शरद पवारांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही, असं रामदास आठवले म्हणाले.

तसेच पुढं बोलताना रामदास आठवले म्हणतात की, शिवसेनेला आपलं भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहण्यात शिवसेनेचं नुकसान आहे. शिवसेनेनं अडीच वर्षाचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर सहमत होऊन शिवसेना आणि भाजपाने एकत्र येवून राज्याच्या प्रगतीला गती द्यावी. तसेच केंद्र सरकारकडून जास्त निधी मिळवत मुंबईसह राज्याच्या विकास करावा. म्हणनूच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यापुर्वी निर्णय घेऊन भाजपसोबत यावं, असं आवाहन केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी केलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात सातत्याने एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. दररोज एकमेकांवर गंभीर आरोप करून सत्तेत राहणं हे तिन्ही पक्षांना परवडणार नाही. काँग्रेसने सत्तेचा पाठिंबा काढावा किंवा शिवसेनेनं मुख्य प्रवाहात यावं म्हणजेच भाजपसोबत यायला हवं, असं आठवलेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री राहावं, आणि महाराष्ट्र राज्याचं भलं करावं, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांमुळे, अजित पवारांना राजकारणात संधी मिळाली मात्र त्यांनी घाण केली”

“शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार”

“अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारीत आहे”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा घट; वाचा आजची आकडेवारी

“जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे..”; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

धक्कादायक! ‘या’ शुल्लक कारणावरून मुंबईत पोलिसाला तृतियपंथीयांकडून मारहाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More