मुंबई | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभव पहावा लागला. परंतू हा पराभव विसरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले आहेत.
आज साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या चिलेवाडी व नागेवाडी या गावात पवारांनी जाऊन तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली. याबाबत कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी व नागेवाडी या गावात भयंकर दुष्काळ असताना मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत उपस्थित राहून जनतेशी संवाद साधला. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित होते.#दुष्काळ@PawarSpeaks @Chh_Udayanraje pic.twitter.com/cPQm8hIupx
— Shashikant Shinde (@shindespeaks) May 25, 2019
निवडणुकीतल्या पराभवानंतर पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पराभव विसरून दुष्काळावर काम करणार असल्याचं सांगितलं होतं. तर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विजयाचा गुलाल अंगावर घेणार नाही, अशी भूमिका घेतली होती.
दरम्यान, सातारा दौऱ्यावर पवारांबरोबर यावेळी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि काँग्रेस नेते प्रविण गायकवाड उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो,’ मला अजूनही ‘या’ दोन क्रिकेटपटूंची भीती वाटते’
-ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत… बुडत्या नावेत कोण बसणार??- देवेंद्र फडणवीस
-स्वरा म्हणते, ‘ज्यांचा मी प्रचार केला ते उमेदवार हरणार हे मला आधीच माहित होतं, पण…’
-काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं पराभवाचं खरं कारण
-अबब! मोदी समर्थकाने चक्क छातीवर कोरले मोदींचे नाव
Comments are closed.