Sharad Pawar-Eknath Shinde | राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अशात राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Sharad Pawar-Eknath Shinde) यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली आहे.
या बैठकीत अतिशय महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतची माहिती अजून समोर आली नाही. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय ठरलं?, याबाबत आता सर्वांना उत्सुकता लागली आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय चर्चा समजू शकलेली नाही. त्यांच्यात मराठा आरक्षणसंबंधी चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. काही दिवसांपुर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सिल्व्हर ओकवर भेट घेतली (Sharad Pawar-Eknath Shinde) होती.
मराठा आरक्षण संबंधी भुजबळ यांनी ही भेट घेतली होती. “महाराष्ट्रात ओबीसी यांना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं आणि आता राज्यात काही जिल्ह्यात फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे, राज्यातील ही परिस्थिती आता शांत करायची तुमची जबाबदारी आहे.” असं भुजबळ शरद पवारांना म्हणाले होते.
पवार आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
तसंच सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मविआ नेत्यांनी हजेरी लावली नव्हती. याबाबतही भुजबळ यांनी शरद पवार यांना सवाल केला होता. भुजबळ यांनी आरक्षणबाबत शरद पवारांना सर्व माहिती आणि राज्यातील परिस्थिती सांगितली होती. त्यानंतर शरद पवार यांनी मी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.
त्यामुळे आज झालेली भेट ही आरक्षण प्रश्नीच असावी, असं म्हटलं जातंय. तसंच आगामी काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच सरकार (Sharad Pawar-Eknath Shinde) पुन्हा या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे.
News Title- Sharad Pawar-Eknath Shinde meeting
महत्वाच्या बातम्या-
“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण?”
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस, सरकारच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष
गर्भवती महिलेसोबत घडलं असं काही..; व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!
मुंबईकरांनो समुद्र किनारी जाऊ नका! मुंबई पोलिसांकडून मोठं आवाहन
इंडियन रेल्वेकडून बंपर भरती, दहावी पास तरुणही करू शकतात अर्ज!