बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी शिवसेना संपवली?, उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले…

मुंबई | गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्या. महाविकास आघाडीचे माजी नगरविकास मंत्री आणि आताचे  मुख्यमंत्री ‘एकनाथ शिंदे’ (Eknath Shinde)  हे काही शिवसेना आमदारांना घेऊन बंड करून गुहावटीला गेले आणि राजकारणातला हा सत्तासंघर्ष सुरू झाला. त्यानंतर अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि झालेला सत्तेचा मोठा कायापालट आपण सर्वांनी पाहिला. सध्या या सर्व घडामो़डींवर सामनाचे(Samna) संंपादक ‘संजय राऊत'(Sanjay Raut) यांनी ‘उद्धव ठाकरे'(Uddhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा (Interview) काही भाग समोर आला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय.

शिवसेना(Shivsena) संपवायला राष्ट्रवादीचे काँग्रेसचे(NCP) प्रमुख ‘शरद पवार ( Sharad Pawar)’ हे कारणीभूत आहेत असं शिवसेनेतून बाहेर पडलेले बंडखोर आमदार म्हणत आहेत. यावर मुलाखतीत संजय राऊत यांनी एक पश्न विचारला की, फुटीरांचं असं मत आहे, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली, यावर ठाकरेंनी अतिशय थोडक्यात उत्तर दिलं, मग आता जे गावोगावी दिसतंय ते काय आहे?, असा मुद्दा ठाकरेंनी  यावेळी उपस्थित केला.

जे बंडखोर आहेत त्यांना सत्तेची चटक होती म्हणून ते गेले. त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून ते गेले. त्यांना सत्तेची लालसा होती म्हणून ते गेले, सत्तेची चटक फार वाईट आहे. पुढे ठाकरे म्हणाले, मला एक अभिमान आहे की मी अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक कधीही लागली नाही. सत्तापिपासूपणा एकदा रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि तुमचं कोणी नसतं आणि हेच बंडखोर आमदारांचं झालं आहे, असं म्हणत ठाकरेंनी बंडखोरांना चांगलचं सुनावलं आहे.

भाजप,(BJP)शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात एकमेकांना टालेबाजी करणं सुरूच आहे. आता शिंदे गट आणि भाजप यांच्या मंत्रीमंडळात कोणकोण मंत्री असणार याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका

‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…

वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची

रक्षाबंधनला भावाकडे जाऊ न शकणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर! टपाल विभागाचा मोठा निर्णय

‘याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय लक्षात ठेवा’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More