बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बेरोजगारी वाढण्याचं संकट मोठं, येत्या काळात तज्ज्ञ-जाणकार लोकांशी बोलून उपाययोजनांची चर्चा करा”

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचा संकट मोठं आहे पण आपण त्याला परतवून लावू असा विश्वास वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे मत आहे की पुढील काळात रोजगार कमी होऊन, बेरोजगारी वाढण्याचे संकट हे फार मोठे असणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे की, पुढील काळात तज्ज्ञ, जाणकार लोकांना एकत्र आणून उपाययोजनांची चर्चा करावी, असंही पवार यांनी सांगितलं.

पुढील काळात दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. त्या म्हणजे देशाच्या अर्थकारणावर व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम. कोरोनाच्या संकटाचा परिणाम अनेक घटकांवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यासाठी आपल्याला जोमाने काम करावं लागेल, असं ते म्हणाले.

पुढील वर्षभरात आर्थिक परिस्थितीची काळजी घ्यायला हवी. विजय केळकरांसारख्या जबाबदार व्यक्तींना सोबत घेऊन आपण स्थितीत बदल करू शकतो. केंद्राकडूनही काही गोष्टींची राज्याला निश्चित अपेक्षा आहे. केंद्राने राज्याला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत म्हणून पॅकेज जाहीर करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलन दाखवली.

शेती व्यवसायाला योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्या देशात गव्हाचे उत्पादन उत्तरेकडे व तांदळाचे दक्षिण भारतात होते. आता रब्बी हंगाम पूर्ण होत आहे,शेतात पिके उभी आहेत. ती काढली नाहीत तर शेती अर्थव्यवस्थेवर व शेतकऱ्यांवर परिणाम होईल. याकडे केंद्राने लक्ष द्यायला हवे, असंही ते म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

‘हल्दीराम’च्या मालकाचं निधन; कुटुंब अडकलं परदेशात

फुले जयंतीला ज्ञानाचा तर बाबासाहेबांच्या जयंतीला संविधानाचा दिवा लावा- शरद पवार

महत्वाच्या बातम्या-

मरकजला गेलेल्यांनी ताबडतोब संपर्क करा, अन्यथा…; मुंबई महापालिकेचा इशारा

त्यांना हे बोलायचा अधिकार कुणी दिला??- सुनिल गावसकर

“दोन खासदारांचा पक्ष आज 300 खासदारांचा हे कार्यकर्त्यांच्या कष्टाचं फळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More