“इटलीमध्ये जाऊन मोदींचा थाट, पण मणिपूरकडे पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”

Sharad Pawar faction | तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा इटलीच्या दौऱ्यावर गेले आहेत. G7 शिखर परिषदेसाठी मोदी इटली दौऱ्यावर आहेत. G7 परिषद ही इटलीत असल्याने यजमान देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आलेल्या नेत्यांचे स्वागत केले. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही स्वागत करण्यात आलं.

या परिषदेमध्ये जागतिक पातळीवरील काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या इटलीच्या दौऱ्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे.

मोदींच्या इटली दौऱ्यावरून शरद पवर गटाची टीका

मणिपूरमधील हिंसाचारचा मुद्दा समोर आणत शरद पवार गटाने मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्यापही पूर्णपणे तेथील परिस्थिती सुरळीत झालेली नाही.यावरून मोदींवर ट्वीटद्वारे टीका करण्यात आली (Sharad Pawar faction) आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदाही मणिपूरमध्ये जावेसे वाटले नाही. हीच का मोदींची गॅरंटी?’, अशा शब्दांत शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. तसेच ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटलीमधील स्वागताचा व्हिडीओ आणि मणिपूरमधील परिस्थिती सांगणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ देखील पोस्ट करण्यात आला आहे.

शरद पवार गटाचे ट्वीट चर्चेत

“मणिपूरमध्ये गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचार कायम असून जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. परंतु निवडणुकीपूर्वी, निवडणुकांच्या दरम्यान आणि निवडणुकीनंतर एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये जावेसे वाटले नाही. याउलट परदेश दौरे करण्यातच पंतप्रधान मोदीजी रमले आहेत. मणिपूरवासियांना वाऱ्यावर सोडण्याची हीच आहे का मोदींची गॅरंटी?”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Sharad Pawar faction) यांच्यावर टीका केली आहे.

News Title –  Sharad Pawar faction Criticizes Pm Narendra Modi Visit To Italy

महत्त्वाच्या बातम्या-

G7 परिषदेपेक्षाही मोदी आणि मेलोनी यांचीच चर्चा; एका सेल्फीने इंटरनेटवर धुमाकूळ

पुणे विमानतळावरुन निघाली मुरलीधर मोहोळांची रॅली, ट्रॅफिक जाममुळे पुणेकर हैराण

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंचा मोठा गौप्यस्फोट!

हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; येणारे दोन दिवस..

मोठी बातमी! नितीश कुमारांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात केलं दाखल