अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक

Sharad Pawar | लोकसभा निवडणूक तोंडावर असताना सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला. या निर्णयाचा दाखला देत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असल्याचा प्रचार करत आहे. यावरून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये जुंपली आहे. अजित पवार गटाच्या एका पोस्टवर व्यक्त होत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सडकून टीका केली आहे. तसेच अजित पवार खोटी माहिती पसरवत असून यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी पवार गटाने केली.

शरद पवार गटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही… असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो. काल सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

अजित पवारांवर निशाणा

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांद्वारे जाहीर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत ‘घड्याळ’ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, असे नमूद करण्यात येईल, असे शरद पवार गटाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून म्हटले.

याशिवाय दुसऱ्या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी ‘घड्याळ’ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे, असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे.

 

Sharad Pawar गटाची टीका

परंतु अजित पवार गटाने मात्र सदर ट्वीटव्दारे खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणाऱ्या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा म्हणजे झालं, अशा शब्दांत पवार गटाने अजित पवारांना लक्ष्य केले.

न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल माफीची मागणी करताना पवार गटाने सांगितले की, गेल्यावेळेसच्या ट्वीटप्रमाणे हे देखील ट्वीट डिलीट करू नका बरं… त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा.

News Title- Sharad Pawar group has criticized Ajit Pawar over the Supreme Court decision
महत्त्वाच्या बातम्या –

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज

आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

आजचे राशिभविष्य! ब्रह्म व इंद्र योगाने आजचा दिवस होईल शक्तिशाली