Sharad Pawar faction | कालच (11 जून) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 25 वा वर्धापन दिन सोहळा अहमदनगरमध्ये पार पडला. मात्र, या सोहळ्यात दोन नेत्यांमध्ये स्टेजवरच कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलं.या प्रसंगानंतर राष्ट्रवादीत धुसपुस असल्याची चर्चा रंगत आहे.
झालं असं की, स्टेजवरच जयंत पाटील (Jayant Patil) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात कलगीतुरा रंगला. यासोबतच रोहित पवार यांनी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर देखील अप्रत्यक्षपणे खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात कलगीतुरा
निकाल लागल्यानंतर जयंत पाटील यांचे ‘निवडणुकीतील किंगमेकर’ अशा आशयाचे पोस्टर लागले होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, कुठेतरी लोकसभा निवडणुकीचे आपणच किंगमेकर आहोत अशा शब्दात श्रेय (Sharad Pawar faction ) घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तसं नाही. असं सांगताना रोहित पवारांनी जयंत पाटील यांच्याकडे अंगुली निर्देश केल्याचं दिसून आलं.
तसंच बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात असं कसं चालेल?, असं म्हणत रोहित पवार यांनी रोहिणी खडसे यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केला. कारण, एकनाथ खडसे भाजपवासी झाले आहेत तर मुलगी मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
यासोबतच लोकसभा निवडणुकीपुर्वी रोहित पवारांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली गेली पाहिजे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात होती. मात्र, अद्यापही त्यांना पक्ष संघटनेत (Sharad Pawar faction ) कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामुळे देखील वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे रोहित पवार यांच्या जवळचा कार्यकर्ता असणाऱ्या विकास लवांडे यांनी जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावी, अशी मागणी केली होती. या सर्व मुद्यांमुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांतर्गत धुसपुस सुरू असल्याचं म्हटलं जातंय.
News Title – Sharad Pawar faction
महत्त्वाच्या बातम्या-
‘ते’ अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत काय?; बजरंग सोनवणेंनी सुनावलं
मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगेंच नाव देण्यात येणार
शिंदे-पवारांचा फायदा नाही, विधानसभेला भाजप स्वबळावर लढणार?
बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?
आज रंगणार भारत विरुद्ध अमेरिका थरार; कोण वरचढ ठरणार?