बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

मुंबई | राज्यात रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्ष कार्यकर्त्यांसह जनतेला एक आवाहन केलं आहे. आपण सगळ्यांनी धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर कोरोनावर मात करु, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही वाढतच आहे. त्यामुळं नागरिकांना आवाहन केलं आहे की, ‘शासनाने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करावं. गर्दी टाळावी, सामाजिक अंतर राखावं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, स्वच्छता राखावी या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात. सभा-समारंभ किंवा गर्दीचे कार्यक्रम टाळावेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील कळविण्यात येतं की, त्यांनी सुद्धा जनतेला ह्या संकटांतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक स्तरावर स्वतःला झोकून द्यावं. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवण्यावर विशेष भर द्यावा’, असं आवाहनही शरद पवार यांनी नागरिकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

‘कोव्हिड-१९’ ह्या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यशासन, पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचारी, रूग्णांना दिलासा देण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. ह्या संकटावर मात करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे, असं मत शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून व्यक्त केलं आहे.

दरम्यान, राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यासाठी रक्तदान शिबिराचे कार्यक्रम सुद्धा हिरीरीने राबवावेत. मला खात्री आहे की, आपण धीर, संयम, दक्षता आणि परस्पर सहकार्याच्या बळावर ह्या महामारीवर निश्चित मात करू’, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

Shree

थोडक्यात बातम्या

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका शब्दानेही बोलत का नाहीत?”

“अनिल देशमुखांच्या निवासस्थानी 100 कोटींबाबतचे पुरावे नष्ट करण्याचं काम सुरु”

“संजय राऊत यांची अवस्था केविलवाणी, सांगताही येत नाही अन्…”

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More