मुंबई | देशात आजपासून म्हणजेच 1 मार्चपासून कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये 60 वर्ष पुर्ण असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
शरद पवार यांनी मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात करोनाची लस घेतली आहे. दुपारी तीन वाजता त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली. यासंदर्भात त्यांनी लसीकरणासंदर्भात व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेेळी त्यांनी नागरिकांना आवाहनही केलं आहे.
मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असं आवाहन शरद पवारांनी ज्येष्ठ नागरिकांना केलं आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज कोरोनाची लस घेतली आहे. सकाळी सात वाजता दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे.
दरम्यान, एम्स रुग्णालयात कोरोनाचा पहिला डोस घेतला. कोरोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मोदींनीही ज्येष्ठ नागरिकांना लस घेँण्याचं आवाहन केलं आहे.
I took my first dose of the #COVID19Vaccine in Sir J. J. Hospital, Mumbai today. To strengthen the Vaccination Drive, I appeal to all those who are eligible to take vaccine and join the fight against corona virus. pic.twitter.com/Tdl9fMxhXs
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 1, 2021
थोडक्यात बातम्या-
मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत – नाना पटोले
“आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु”
सैन्य भरती परीक्षेचा पेपर फुटला, पोलिसांनी केली ‘ही’ धडक कारवाई
…तर मी थेट राजीनामा दिला असता- सुजय विखे
‘दादांच्या पोटातलं ओठावर आलं’; ‘या’ मुद्दयावरून अजित पवार देवेंद्र फडणवीसांमध्ये जुंपली
Comments are closed.