शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीचं सारथ्य त्यांचा चालक गामा करतो हे सगळ्यांना माहित आहे. मात्र आज त्यांच्या गाडीचं सारथ्य चक्क त्यांची नात रेवतीनं केलं. 

रेवती ही राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आहे. मुंबईतील पत्रकार परिषद आटोपल्यावर ती आपल्या आजोबांना घेऊन गेली.

शरद पवार यांचे नातू राजकारणात सक्रीय होत आहेत. शरद पवार स्वतः त्यांना घेऊन कार्यक्रमांना फिरत आहेत हे अलिकडं पाहण्यात आलं होतं. 

दरम्यान, आता नातीनं त्यांच्या गाडीचं सारथ्य केल्यानं हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय

-शरद पवारांचा गडकरींना प्रेमाचा सल्ला; म्हणाले तब्येतीला सांभाळा…

धक्कादायक! पोलीस निरीक्षक सुबोधकुमार यांना जवानाने गोळी घातली

-…या कारणानं नितीन गडकरींना आली चक्कर !

-मिकाला अटक झाल्याने राखीला रडू कोसळलं; सोडवायला दुबईला जाणार