“सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे..”; शरद पवार गटात राजकीय भूकंप

Sharad Pawar Group | सध्या लोकसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शरद पवार यांच्या गटातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांच्या गटातील एका नेत्याने लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडणार असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर, यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. (Sharad Pawar Group)

सोनिया दुहान यांनी माध्यमांसोबत बोलत असताना सुप्रिया सुळेंबाबत एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने महायुतीला मोठा फायदा देखील होऊ शकतो. सोनिया दुहान यांनी माध्यमांसोबत बोलत असताना सुप्रिया सुळे आमच्या नेत्या होऊ शकल्या नाहीत, असं म्हटलं आहे. (Sharad Pawar Group)

“सुप्रिया सुळे आमच्या नेत्या होऊ शकल्या नाहीत”

“आम्ही सर्व नेते म्हणजे मी असेल, धीरज सारखे नेते आहेत. त्या सर्वांचे शरद पवार हे नेते आहेत, असतील आणि कायम राहतील. आमची पूर्ण निष्ठा ही शरद पवार यांच्यासोबत राहिल. आमच्या वर्किंग कमिटीच्या सुप्रिया सुळे अध्यक्षा आहेत त्यांचा देखील शरद पवार यांच्या कन्या म्हणून आम्हाला अभिमान आहे. पण सुप्रिया सुळे या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत.”, असं सोनिया दुहान यांनी माध्यामांसोबत संवाद साधत असताना म्हटलं आहे.

त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे आमच्यासारखे जे एकनिष्ठ आहेत. ते शरद पवार यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत. ते लोकं निर्णय घेतात आणि पक्षाला सोडून जाण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सोनिया दुहान यांनी केला आहे. (Sharad Pawar Group)

“मी लवकरच पक्ष सोडणार”

“मी अजूनही पक्ष सोडला नाही. मी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. मी लवकरच याबाबत निर्णय घेणार आहेत. मी दुसऱ्या कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही. तुम्हाला वाटेल की मी भाजपमध्ये जाईल, काँग्रेस पक्षात जाईल, मी अजित पवार गटात जाईल तर तसं होणार नाही. मी सध्या कोणताच निर्णय घेणार नाही. सुप्रिया सुळेंच्या आजूबाजूला काम करणारे काही नेते आहेत, ते पक्षाला संपवण्याचं काम करताना दिसत आहेत.”, असा गौप्यस्फोट सोनिया दुहान यांनी केलाय.

सोनिया दुहान या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar Group) विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात त्यांना ‘लेडी जेम्स बाँड’ म्हणून ओळखलं जातं. शिंदे गटाचे आमदार हे गुवाहाटीवरून गोव्याला आले होते. तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान हॉटेलमध्ये शिरल्या होत्या. मात्र त्यांच्यासोबत संपर्क करत असताना त्यांचा प्रयत्न असफल ठरला.

दरम्यान नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पदाचा धीरज शर्माने राजीनामा दिला आहे. आज सोनिया दुहान यांनी केलेल्या वक्तव्याने शरद पवार गटात पुन्हा पोकळी निर्माण होऊ शकते अशी संभावना आहे. तसंच सुप्रिया सुळे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची देखील राजकीय वर्तुळात आता चर्चा होऊ लागली आहे.

News Title – Sharad pawar Group In Lady James bond Sonia Duhan Bigg Statement About Supriya Sule

महत्त्वाच्या बातम्या

“शरद पवारांना शिवसेना संपवायचीये”, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Hrithik Roshan सोबत पुन्हा रोमांन्स करणार अमिषा पटेल?; स्वत:च केला मोठा खुलासा

भुजबळ यांच्यानंतर आता समता परिषदेचा मनुस्मृतीला विरोध

अबू सालेमसोबत कंगनाची पार्टी?; ‘त्या’ व्हायरल फोटोवर अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण

“ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”, सुप्रिया सुळेंची सरकारकडे थेट मागणी