Sharad Pawar | विधानसभा निकाल लागल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला पहिला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार)जेमतेम 10 आमदार निवडून आले आहेत. तर, अजित पवार गटाचे 40 च्या वर आमदारांनी विजयी गुलाल उधळला आहे. अशात शरद पवारांना मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. (Sharad Pawar )
निवडणूक होण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेक बड्या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्याचं दिसून आलं. यामध्ये अजित पवार गटातील अनेक नेत्यांचं इनकमिंग दिसून आलं. मात्र, निवडणुकीनंतर चित्र पालटले आहे. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेत्यांची इनकमिंग सुरू झाली आहे.
राहुल जगताप अजित पवार गटात जाणार?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) हे पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती आहे. याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत. राहुल जगताप हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय.
राष्ट्रवादीचे जेव्हा दोन गट पडले तेव्हा राहुल जगताप हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Vidha Sabha Election 2024) निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. मात्र, ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला सुटली. येथे ठाकरे गटाकडून अनुराधा नागवडे (Anuradha Nagawade) यांना उमेदवारी मिळाली होती.त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी केली होती. (Sharad Pawar )
राहुल जगताप-अजित पवार भेट
त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे आणि अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत झाली. यामध्ये महायुतीचे विक्रम पाचपुते यांनी बाजी मारली. अनुराधा नागवडे व राहुल जगताप यांचा येथे दारुण पराभव झाला.
अशात राहुल जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ते राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. असं झाल्यास शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो. निवडणुकीतील पराभवानंतर हा शरद पवारांना पहिला मोठा धक्का असेल. (Sharad Pawar )
News Title- Sharad Pawar group leader Rahul Jagtap likely to join NCP
महत्वाच्या बातम्या-
ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, राज्यातील ‘या’ भागांसाठी IMD चा हायअलर्ट
पवार साहेबांनी आर. आर. आबांच्या लेकावर टाकली पक्षाची मोठी जबाबदारी!
12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!, सोशल मीडियावर माहिती देत अभिनयाला केला राम राम
महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?
“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा