बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांचा ‘तो’ अंदाज ठरला खरा, दीड महिन्यापूर्वीच वर्तवलं होतं निकालाचं भाकित

मुंबई | देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीच्या सर्वाचं लक्ष लागून होतं. निकल आता जवळपास काहीसा स्पष्ट झाला आहे. मतमोजणीला सहा तास उलटले आहेत. मात्र यामध्ये केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजप पक्षालापाच राज्यांपैकी फक्त एका राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळताना दिसत आहे. मात्र या निकालांचं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जे भाकीत वर्तवलं होतं ते भाकीत खरं ठरताना दिसत आहे.

इतर चार राज्यांच्या तुलनेत आसाममध्ये भाजपची स्थिती चांगली आहे. त्यामुळे तिथे भाजप सत्ता राखेल. तर इतर राज्यांमध्ये दुसरे पक्ष विजयी होतील, असा अंदाज शरद पवारांनी व्यक्त केला होता. तर केंद्रातील सत्तेचा पूर्ण गैरवापर करूनही भाजपला बंगालची सत्ता मिळणार नाही. ममता बॅनर्जी सत्ता कायम राखतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला होता.

आसाममधील 125 पैकी 77 जागांवर भाजपचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे आसाममध्ये भाजपची सत्ता कायम राहील हे स्पष्ट झालं आहे. पुद्दुचेरीत विधानसभेच्या एकूण 30 जागा आहेत. यापैकी भाजप आणि मित्रपक्ष 8 जागांवर आघाडीवर आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रचार केला होता. मात्र तिथेही भाजप 85  जागांच्या आसापस अडकली आहे. तर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष 200 हून अधिक जागा जिंकताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या- 

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More