पुणे | ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटानंतर काश्मिरी पंडितांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. या मुद्द्यावरून राजकारण रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी कश्मीर पंडितांच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली आहे.
काश्मिरमधील एक घटक निघून गेला. त्यावर एक सिनेमा आला. त्यानंतर काँग्रेसवर (Congress) टीका झाली. पण यामुळे मन जोडण्याऐवजी मन तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरायला मदत केली जात आहे, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
काश्मीरमधून काश्मीर पंडित बाहेर गेले त्यावेळी सत्तेत काँग्रेस पक्ष नव्हताच. त्यावेळी व्ही पी सिंह यांची सत्ता होती. भाजपचे त्यांना सहकार्य होते. म्हणजे भाजपच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा गांधीवर टीका टीप्पणी केली जात आहे. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी देशाला फक्त स्वातंत्र्य दिले नाही तर देशाला दिशा दिली आहे. आज आपण आपल्या देशाला एकसंघ ठेवायचं आहे, असं वक्तव्य देखील शरद पवार यांंनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
IPL 2022! मिस्ट्री गर्लनं उडवलीय सर्वांची झोप, पाहा कोण आहे ‘ही’ तरुणी
Health ! काॅफी सेवनाचे आहेत ‘हे’ महत्त्वाचे फायदे
मोठी बातमी! बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्ला, पाहा व्हिडीओ
IPL 2022! अक्षरच्या धागा खोल खेळीच्या बळावर दिल्ली विजयी
“आम्ही आता सिक्सच मारणार आणि उद्घाटन करणार”
Comments are closed.