बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत नेमकं शिजतंय काय? शरद पवार सोनिया गांधींच्या भेटीला

नवी दिल्ली | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि युवानेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. अशातच आता शरद पवारांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

शरद पवारांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या बैठकीला संजय राऊत देखील उपस्थित होते. जम्मू काश्मीर नेते फारूक अब्दुल्ला आणि मल्लिकार्जुन खर्गे देखील उपस्थित होते. देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने ही अतिमहत्त्वाची बैठक असल्याचं चर्चेला उधाण आलं आहे.

“आम्ही एकत्रित काम करणार आहोत, उद्या आमच्या पुन्हा बैठक होणार आहे, उद्याच्या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत”, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजकीय स्वरूपाची बैठक असल्याने सर्व गोष्टी सांगण्यात येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यावर देशात तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले होते. त्यामुळे काँग्रेसचा पत्ता कट होणार का ? असा सवाल आता उपस्थित करण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

15 विद्यार्थी Corona Positive सापडल्यानं खळबळ, विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

राहुल गांधींच्या सभेवरून आघाडीत रंगलाय कलगीतुरा?, पण भाई जगताप म्हणतात…

जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल?, चाहतेही झालेत हैराण

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More