बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”

मुंबई | देशात मोदी सरकार विरोधात 100 खासदारांची आघाडी तयार करुन विरोधकांना वाटतंय मोठं काम झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी कधीच सुधरणार नाहीत, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरही निशाणा साधला आहे.

स्व. राजीव गांधी यांनी पवार साहेबांना ओळखून त्यांना कधी जवळ केलं नाही कारण, त्यांना माहीत होतं पवार साहेब कधी सटकतील कळणार नाही पण राहुल गांधी आपले कोण परके कोण कळण्याइतके परिपक्व नाहीत, अशी जहरी टीका निलेश राणेंनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

भाजप नेते निलेश राणे त्यांच्या ट्विट मध्ये असं म्हणतात की, लालुप्रसाद यादव जेव्हा लोकसभेमध्ये खासदार होते तेव्हा ते लोकसभेच्या गॅलरीमध्ये नेहमी बोलायचे जोपर्यंत पवार साहेब राजकारणात आहेत तोपर्यंत ज्यापक्षाची सत्ता असेल त्यांना बिनकामाचा त्रास देण्यात शरद पवारांचा अर्धा वेळ जातो, अशी टीका निलेश राणेंनी शरद पवारांवर केली आहे.

दरम्यान, पवार साहेबांना करायचं काहीच नसतं फक्त बावल्या नाचवायच्या असतात. राहुल गांधींना लवकरच कळेल, अशी गंभीर टीका भाजप नेते निलेश राणेेंनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर केली आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यपालांना परिस्थिती आणि जबाबदारीचं भान असावं – मुंबई उच्च न्यायालय

विनावर्दी कारवाई करणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश!

बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा देत मोदींनी सांगितली 40 वर्षांपूर्वीची आठवण, म्हणाले…

“रानडे इन्स्टिट्यूटवर दरोडा घालण्याचा प्रयत्न सुरुय, आम्ही तो हाणून पाडू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More