धनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी मध्यस्थी करावी; याचिकाकर्त्यांची मागणी

धनगर आरक्षणासाठी पवारसाहेबांनी  मध्यस्थी करावी; याचिकाकर्त्यांची मागणी

मुंबई | धनगर आणि आदिवासी समाजातील वाद टाळण्यासाठी शरद पवारांनी शासनदरबारी मध्यस्थी करावी, अशी मागणी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’ संघटनेचे अध्यक्ष आणि याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची हेमंत पाटील यांनी भेट घेतली. भेट घेऊन ही मागणी केली असल्याचं त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं.

मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद टाळत मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण दिलं, त्याचं प्रकारे धनगर समाजालाही स्वतंत्र 7 टक्के आरक्षण देण्यासाठी पवारांनी शासनदरबारी पुढाकार घ्यावा, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आचारसंहिता लागण्याआधी धनगर आरक्षणावर तोडगा निघाला नाही, तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

श्रीपाद छिंदमसाठी भावाने केली चक्क ‘ईव्हीएम’ची पूजा

-“राम पृथ्वीवर आला तर अच्छे दिन येणार आहेत का?”

…म्हणून माझ्यावर हल्ला झाला- रामदास आठवले

-“लष्कराचा वापर खासगी संपत्तीप्रमाणे करताना मोदींना शरम वाटत नाही”

-…या तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये होणार मोठी घरवापसी
Google+ Linkedin