“काहीही करा पण…”; शरद पवारांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती

Sharad Pawar | राज्याचे माजी कृषिमंत्री आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या बारामती तालुक्यातील गावांमध्ये दौरे करत आहेत. त्यांनी काल परवा त्यांच्या जन्मस्थानी म्हणजे बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे जात मोदींवर हल्लाबोल केला. तसेच त्यांनी आज बारामतीतील काही गावांमध्ये जात पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी काहीही करा पण जमीन विकू नका, अशी विनंती शेतकऱ्यांना केली आहे.

“काही करा पण जमीन विकू नका”

शरद पवारांनी (Sharad Pawar) जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटला इथं फिरकू न देण्याचा सल्ला दिला आहे. काही करा पण जमीन विकू नका. पुणे, मुंबईकर येतील. पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल तर त्याला गावात येऊ देऊ नका, असं आवाहन शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं आहे.

पिकवणाऱ्याने पिकवलं नाहीतर खाणारा काय खाईल? पिकवणारा जर उद्ध्वस्त झाला तर खाणारा पण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान राज्यात येतात आणि एकाच व्यक्तीला लक्षात ठेवतात. यातून सुटका करायची आहे. त्यांच्या हातून सत्ता घ्यावी लागेल. मी ठरवलं आहे, राज्यात बदल करायचा आहे. महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचं आहे, असं शरद पवार बोलत होते.

शरद पवार हे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीवर बोलले. त्यांनी सुप्रिया सुळेंच्या मतांची तुलना ही थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतांसोबत केली आहे. ते म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळेंना बारामतीकर चांगलं मताधिक्याने विजयी करतील ही खात्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1.50 मतांनी विजयी झाले. तर तुमच्या उमेदवार हा 1.80 मतांनी निवडून आला, असं शरद पवार म्हणाले.

त्यानंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या गॅरंटीवर बोटं केलं आहे. ते म्हणाले की, मोदींना माहिती नाही बारामतीची गॅरंटी काय आहे. त्यांचं माझं भांडण नाही पण त्यांचं धोरण चुकीचं आहे. त्यांचं धोरण आपल्या हिताचं नाही. त्यांचे धोरण हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

मोदींच्या गॅरंटीवर शरद पवारांचं भाष्य

तसेच पुढे शरद पवारांनी बारामतीच्या मोरगावात जनसंवाद सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलत असताना शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, बारामतीतील लोकसभा निवडणुकीची चर्चा देशात होती. या निवडणुकीत लोकांनी दमदाटी केली. नवीन लोकांनी आवर घालण्याचं काम काही लोकांनी केलं. मात्र यावेळी निवडणूक ही सामान्यांनी हातात घेतली. मोदींनी एकूण राज्यात 18 सभा घेतल्या. त्यापैकी 10 जागांवरील उमेदवार पडले. मोदींनी राज्यात येऊन त्यांची गॅरंटी सांगितली पण त्यांची गॅरंटी चालली नाही, असं म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना धारेवर धरलं.

News Title – Sharad Pawar Humble Request To Farmer About Do Not Sell Land

 महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ भागाला हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 6 दिवसांपर्यंत कोसळणार पाऊस

पुणेकरांनो काळजी घ्या! पुढील तीन दिवस धो-धो पाऊस बरसणार, यलो अलर्ट जारी

“विखे कुटुंबियांचा मला अभिमान, लवकरच..”; निलेश लंकेंचं भुवया उंचावणारं वक्तव्य

उपोषणस्थळावरून वडेट्टीवारांनी लावला थेट मुख्यमंत्र्यांना फोन, शिंदे म्हणाले ‘त्यांना म्हणावं…’

रिल स्टार ‘माऊ’ घरातून अचानक गायब; सुसाईड नोट सापडल्याने खळबळ