बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेत विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता शरद पवार अॅक्शनमोडमध्ये आल्याचं दिसतंय.

शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्वर ओक या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची लगबग पाहण्यास मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सकाळीच सिल्वर ओक बंगल्यावर पोहोचले आहे. काही वेळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

मराठा आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण आणि काँग्रेसची नाराजगी या प्रमुख विषयावर भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर मराठा आरक्षणासंदर्भात आज खासदार संभाजीराजे शरद पवार यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहेत. ‘सरकार टिकवणे ही एकट्या शिवसेनेचीच जबाबदारी नाही’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यावर ब्रिच कँडी रूग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. त्यामुळे शरद पवारांनी विविध मुद्यांवर विस्तृत माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली आहे. त्यामुळे आता शरद पवार मराठा आरक्षणावर काय भूमिका घेतात आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना काय सुचना करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात काळ्या बुरशीचा धोका वाढला; गेल्या 24 तासातील आकडेवारी धक्कादायक

पुढील दोन दिवसांत राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर चर्चा

‘लसीचा शस्त्र म्हणून नाही तर, वैयक्तीक प्रचारासाठी वापर’; प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More