राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून शरद पवार ‘भारत बंद’ आंदोलनात सहभागी

नवी दिल्ली | काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामलीला मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज भारत बंद ची हाक दिली होती. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असून सरकारला वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, शरद पवारांनी या आंदोलनात सहभाग घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ही मोदी सरकारची बहादुरी असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंना कोणताही फोन आला नाही- संजय राऊत

-इंग्रज बंदुकीने तर भाजप सीबीआयच्या धाकाने देश चालवतो- गुलाब नवी आझाद

-सुप्रीम कोर्टदेखील आमचंच आम्ही राम मंदिर उभारणारच- भाजप आमदार

-संभाजी भिडेंची प्रवृत्ती ठेचून काढा; अजित पवारांचा आदेश

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या