Top News

नवे चेहरे समोर आणणार; आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पवारांचं सूचक वक्तव्य

मुंबई |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित मुंबईत महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी कावळ्यांची चिंताा करू नये तर मावळ्यांची चिंता करावी असा सल्ला देतानाच पक्षातील नवीन चेहरे समोर आणणार असल्याचं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

विधानसभा निवडणुक फक्त 3 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व प्राप्त झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागली आहे. ती गळती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. जे गेलेत त्यांना जाऊ द्या… जे सोबत राहतील ते मावळे आहेत. त्यांना घेऊन पुढील लढाई जिंकू, असं राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने 15 नावे तयार ठेवावीत, असा आदेश पवारांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना दिला आहे.


महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक!!! मुनगंटीवारांच्या चंद्रपुरात अ‌ॅम्बुलन्समधून अवैध दारूची वाहतूक….

-ही अभिनेत्री म्हणते… सलमान खान माझ्याशी लग्न करणार आहे!

-शरद पवार म्हणतात… कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी!

-पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून पुन्हा सुरू

-“महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर गुन्हेगारीचं केंद्र अन् मुख्यमंत्रीदेखील त्याच गावचे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या