बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात, दिवाळीनंतर राजकीय समीकरण बदलणार?

मुंबई | महाराष्ट्रात सध्या आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वत: मैदानात उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीने आपल्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली असताना आता पिंपरी चिंचवडमधील बैठकांनंतर शरद पवारांनी पुणे महापालिकेकडे लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवाळीनंतर पुण्यात राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या बैठकांचं सत्र पार पडणार आहे. त्यातच आता पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवाळीनंतर राष्ट्रवादीत अनेक आजी माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

पुणे महापालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी आता राष्ट्रवादीने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच सध्या भाजपच्या ताब्यात असणारी पुणे महापालिका खेचून आणण्यात राष्ट्रवादीला यश येणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीत राष्ट्रवादी काय रणनिती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागुन राहिलं आहे.

पुणे महापालिकेत एकूण 164 नगरसेवक आहेत. त्यापैकी 45 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यावर आता ही संख्या वाढवण्यासाठी राष्ट्रवादी चांगलीच जोमाने कामाला लागली असल्याचं दिसून येतंय. येणाऱ्या निवडणुकीत कोणाचं पारडं जड होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

आर्यन खान प्रकरणाला नवं वळण, एनसीबी पंचानेच केले समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

माही ‘हा’ सामना नको जिंकू म्हणणाऱ्या पाकिस्तानच्या तरूणीला धोनीचं भन्नाट उत्तर, पाहा व्हिडीओ

कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलं 100 कोटींचं घबाड; नोटा मोजायला लागला ‘इतका’ वेळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा मोठा गोंधळ, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्याच नाही

‘या’ रेल्वे स्थानकावर 55 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, प्रशासनाची झोप उडाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More