पुणे | मी कधी वारी केली नाही, पण कधी वारीचा अनादरही केला नाही. जर कधी पंढरपूरला गेेलो तर फार लोकांना बरोबर न घेता पांडुरंगाचं दर्शन घेतो, अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ‘उजळावया आलो वाटा’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते पुण्यात बोलत होते.
मी वारीपासून बाजूला असतो असं बोललं जातं, मात्र मला कोणत्याही गोष्टीचा दिखावा केलेला आवडत नाही. त्यामुळे पांडुरंगाचं दर्शन घेतांना फोटो प्रसिद्ध व्हावेत अशी माझी अजिबात इच्छा नाही, असं ते म्हणाले.
राज्याची जबाबदारी माझ्यावर होती, त्यावेळी एकदाही पांडुरंगाची शासकीय पूजा मी चुकवली नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या विठू माऊलीचं दर्शन मी गाजावाजा न करता करून येतो. मी कधी वारी केली नाही पण दोन थोर व्यक्तींसोबत मैल मैल चालण्याचा योग लहानपणी आला. पहिली व्यक्ती म्हणजे गाडगे महाराज व दुसरी तुकडोजी महाराज! pic.twitter.com/hZGhoqqxv4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2018
यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाच्या भूमिपूजनाला थेट विठ्ठलाला साद घातली होती. हे विठ्ठला, तुझी चंद्रभागा मी अडवतोय! कारण या पाण्यावर शेतकऱ्यांच्या शेतात शाळूचं पीक जोमानं वाढेल आणि कणसाच्या दाण्यादाण्यात त्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल, असे ते म्हणाले होते.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 8, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-संतांपेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ नाही; भुजबळांचा भि़डेंवर निशाणा!
-गोपाळ शेट्टींचे काय चुकले?; सामनाच्या अग्रलेखात भाजप खासदाराची पाठराखण
-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!
-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा