Loading...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा मोठा निर्णय, इथं साजरा करणार स्वातंत्र्यदिन

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पूरग्रस्त भागामध्ये जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. काल मंगळवारी रात्री ते कराडला दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी ते हातकणंगले आणि शिरोळचा दौरा करणार आहेत.

15 ऑगस्टला ते शिरोळमध्ये ध्वजवंदनानंतर हातकणंगले आणि कोल्हापूरकडे रवाना होतील. यानंतर चिखली, आंबेवाडी, वडंगे या गावात जाऊन ते पूरग्रस्त भागाची पाहणी करतील आणि तेथील अडीअडचणी समजावून घेतील.

Loading...

सांगली- कोल्हापूरात आलेल्या पुरामुळे स्थानिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांचं पुनर्वसन करण्याची मोठी जबाबदारी सरकारवर आहे. त्याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत म्हणून 50 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे.

दरम्यान, पुरग्रस्तांची मदत करण्यात सरकारला अपयश आल्याची टीका राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केली. मात्र आम्ही केवळ टीका-टिप्पणी करत नाही तर प्रत्यक्ष मदतही करतो, असं मत राष्ट्रवादीकडून व्यक्त करण्यात येतंय.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-सुषमाजींनी ‘प्रोटोकाॅल’ला ‘पीपल्स काॅल’मध्ये बदललं- नरेंद्र मोदी

-सुषमा स्वराज यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं; नरेंद्र मोदी भावूक

-मुख्यमंत्र्यांच्या ‘महाजनादेश’ यात्रेच्या वेळापत्रकात पूरस्थितीमुळे बदल

Loading...

-“जनाची नाही मनाची असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्या 2 मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत”

-“केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार तरी पाणी सोडलं नाही”

Loading...