शरद पवारांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत पुढे ढकलली

पुणे | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुण्यात 6 जानेवारी रोजी आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे ही मुलाखत घेणार होते. 

भीमा कोरेगाव प्रकरणामुळे राज्यभरात तणावाचं वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही मान्यवरांच्या संमतीने 6 तारखेला होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 

6 तारखेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तरी दोन्ही मान्यवरांची वेळ घेऊन नवीन दिवस ठरवला जाणार आहे. त्या दिवशी ही मुलाखत पार पडेल. मुलाखतीची तारिख ठरल्यानंतर ती कळवली जाईल, असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय.