मुंबई | महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून आपण खासदार सुप्रिया सुळे यांना पाहता का?, असा सवाल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना करण्यात आला. यावर शरद पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिलं आहे.
शरद पवारांचा येत्या 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. 12 तारखेला ते 80 वर्षाचे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमतचे चेअरमन विजय दर्डा यांनी त्यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी पवारांना सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री होण्याबाबतचा प्रश्न केला.
माझ्या माहितीप्रमाणे सुप्रिया सुळे यांचा इंटेरेस्ट राज्यात नाही. त्यांचा इंटरेस्ट राष्ट्रीय राजकारणात आहे, पार्लमेंटमध्ये आहे. सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कारही मिळाले आहेत. प्रत्येकाचा इंटरेस्ट असतो त्यांचा तिकडे आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे.
दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादीच मुख्यमंत्री होणार असेल तर शरद पवार पुतण्याला नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुणे पदवीधर मतदारसंघाच्य निवडणुकीत लगावला होता.
महत्वाच्या बातम्या-
एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन
‘माफी मागा अन्यथा तोंड काळ करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा
2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प
…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला
“अमेरिका जगाला एकत्रही ठेवू शकला नाही, जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम”