sharad pawar 2 1 - सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल- शरद पवार
- Top News

सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल- शरद पवार

मुंबई | सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच देशात आणि राज्यातही महायुती व्हायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आजतकच्या मुंबई मंथन कार्यक्रमात ते बोलत होते.

उत्तर प्रदेशात जिंकण्यासाठी सपा आणि बसपाची साथ मिळणं गरजेचं असून भारतीय जनता पक्षानेही नेहमीच कोणाची तरी साथ घेतली आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राजकारणात पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, तेव्हाच 50 वर्ष राजकारण करता येईल असं उत्तर देताना मला अपघाती राजकारणात सहभागी होण्याची इच्छा नाही असंही त्यांनी सांगितलं.  

महत्त्वाच्या बातम्या-

-पैशांची कामे पूर्ण होताच राजीनामे खिशात ठेवले जातात; राज ठाकरेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-दारूच्या दुकानासाठी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमने-सामने

-शिवेंद्रराजे आणि उदयनराजे दोघानांही मी सांगून दमलो!

-अनु मलिक मला घरी बोलवायचे; अाणखी एका गायिकेचा गौप्यस्फोट

-दिवाळीत फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी; मात्र या वेळेतच फोडण्याची अट

या बातमीवर तुमची कमेंट लिहा