बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे नेते म्हणजे शरद पवार”

मुंबई | राष्ट्रवादी काॅंग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 81 वा वाढदिवस. देशभरातून शरद पवार यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं कौतुकही केलं आहे.

मुंबईत माध्यमांशी बोलताना शरद पवार यांना वाढदिवसाच्या (Birthday) शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना, महाराष्ट्राचे, देशाचे सर्वात ज्येष्ठ, अनुभवी नेते म्हणून आम्ही शरद पवारांकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं मोठं योगदान आहे.

देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून शरद पवारांनी त्यावेळी अनेक पावलं टाकली. ते प्रचंड लोकपिय, जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत, अशी स्तुतीसुमनेही यावेळी संजय राऊत यांनी पवारांवर उधळली.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी त्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हती. आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! एकाच दिवसात घेतली तब्बल ‘इतक्या’ वेळा कोरोना लस

“गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा एकही नेता आज भाजपात नाही”

“विवाहबाह्य लैंगिग संबंध ठेवणे म्हणजे गंभीर पाप नाही”

“दिग्विजय बागल आपला हा माज नक्की उतरवला जाईल”

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More