बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात’; चंद्रकांत पाटलांची बोचरी टीका

सातारा | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातील फलटणमध्ये भाजपच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते गेले होते. फलटनमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी संजय राऊत (Sanjay raut) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलेला पहायला मिळाला.

संजय राऊत हे कधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पंतप्रधान करायला निघालेत तर कधी शरद पवार पंतप्रधान होतील असं म्हणत आहेत. शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

फलटण तालुका आणि शहराच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी घेतलेल्या या सभेत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवरही खोचक टीका केलेली पहायला मिळाली.

दरम्यान, ज्यांनी आमच्या जीवावर अठरा खासदार निवडून आणलेत ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्न बघत आहेत. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गणा करु नयेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं”

महिलेला मधलं बोट दाखवणं भोवलं; न्यायालयाने तरूणाला घडवली चांगलीच अद्दल

‘आता हा नेता अनिल देशमुखांच्या वाटेने जाणार’; किरीट सोमय्यांच्या नव्या दाव्याने खळबळ

‘…तर Omicron मुळे देशात तिसरी लाट येईल’, IMAचा इशारा

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More