बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

नागपूर | 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या होत्या, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं. सर्वाधिक जागा असलेल्या भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. यावेळी घडलेल्या घडामोडींवरुन राज्याच्या राजकारणात नेहमीच चकमकी घडत असतात. पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांनी यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्रात सत्तेची ऑफर न स्वीकारण्या इतके शरद पवार कच्च्या गुरूचे चेले नाहीत. केंद्र सरकारमध्ये असलेल्या पक्षांबरोबरच त्यांनी सत्ता स्थापन प्राधान्य दिलं असतं, असं  म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला माहित आहे की, त्याचे अर्थ काय होतात, असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. भाजपने शरद पवार यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं नुकतंच केलं होतं, त्याचा चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला संदर्भ होता.

महाराष्ट्रातसह संपुर्ण देशात कोळशाचं संकट घोंगावत आहे. यावरून चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. काही झालं तरी त्याचं खापर किंवा दोष केंद्राकडे देऊन मोकळे होतात. कोळसा कमी आहे, केंद्राने कोळसा दिला नाही, असं महाविकास आघाडीकडून सांगितलं जात आहे. केंद्र सरकारने कोळशाचा स्टॉक करून ठेवा हे आधीच सांगितलं होतं. पावसामुळे कोळसा कमी मिळेल, असंही केंद्र सरकारने सांगितलं होतं, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.

दरम्यान, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतयं, असं वक्तव्य नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. त्यावरून शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला आहे.  मी चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटलं नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More